AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी अवजारे भाडेतत्त्वावर!
सल्लागार लेखविकिपीडिया
कृषी अवजारे भाडेतत्त्वावर!
➡️ग्रामीण भागामध्ये शेतीकामांसाठी मजुरांची कमतरता जाणवत असून, शेतकऱ्यांनाही यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय उरलेला नाही. ➡️शेतीमध्ये विविध कामांसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे खरेदी करणे छोट्या व मोठ्याही शेतकऱ्यांसाठी अव्यवहार्य बाब आहे. त्यामुळे बचत गट किंवा ग्रामपंचायत पातळीवर शेती उपयोगी अवजांराची खरेदी करून परिसरातील शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर देणे, हाही चांगला सेवा उद्योग होऊ शकतो. ➡️असाच एक पथदर्शी प्रकल्प बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने राबविला आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी अनेक अवजारे गरजेनुसार उपलब्ध होत असून, उत्पादन खर्चामध्ये बचत होत आहे. सोपी, सुटसुटीत कार्यपद्धती ➡️शेतकऱ्यांला अवजार भाड्याने हवे आहे, त्याने आपला ट्रॅक्‍टर आणायचा, सोबत सातबारा आणायचा, ओळख पटवायची आणि एक हजार रुपयांपर्यंतची अनामत रक्कम भरून अवजार वापरण्यासाठी न्यायचे, अशी ही साधी सुटसुटीत संकल्पना "कस्टम हायरिंग सेंटर' या नावाने सुरू करण्यात आली. ➡️कृषी विज्ञान केंद्र यंत्रांच्या स्थितीनुसार प्रति दिन 50 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत भाडे आकारते. ➡️अशी आहेत यंत्रे, अवजारेकृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी क्षारपड जमिनींसाठी किंवा चर पाडण्यासाठी सबसॉयलर (एकदाती नांगर), डिस्क हॅरो, पेरणी यंत्र, रेजर, चार फाळी नांगर, रोटावेटर, मळणी यंत्र, खोडकी, बगल फोडणी यंत्र, भुईमूग शेंगा फोडणी यंत्र, हळद काढणी यंत्र, डस्टर, खते टाकण्यासाठी पहार, भाजीपाला रोपे लागवड यंत्र अशी वेगवेगळी अवजारे उपलब्ध करून दिली आहेत. ➡️सबसॉयलरसारखी अवजारे क्षारपड जमिनीसाठी तीन वर्षांतून एकदा वापरण्याची शिफारस आहे. हे अवजार विकत घेण्यापेक्षा प्रति दिन 300 रुपये भाड्याने मिळाल्यास अधिक सोईचे ठरते. जमिनी समपातळीमध्ये आणण्यासाठी अत्याधुनिक लेसर लेव्हलरसारखी यंत्रे प्रति तास 800 रुपये भाड्याने उपलब्ध होतात. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- विकिपीडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
7
इतर लेख