AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी अभियांत्रिकी' क्षेत्र आहे करिअरसाठी खूपच उत्तम !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
कृषी अभियांत्रिकी' क्षेत्र आहे करिअरसाठी खूपच उत्तम !
📝अभ्यासक्रमाला येणार्‍या भविष्यकाळात असणाऱ्या संधी किती हे पाहणे खूप गरजेचे असते. त्यामुळे या लेखात आपण शेती क्षेत्राशी संबंधित असलेल्या एग्रीकल्चर इंजीनियरिंग अर्थात कृषी अभियांत्रिकी या विषयी माहिती घेऊ. 📝'कृषी अभियांत्रिकी' भविष्यातील मोठी संधी सायन्स अर्थात विज्ञान शाखेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये खूप मोठी संधी असून येणाऱ्या काळात कृषी अभियंत्यांना खूप मोठी मागणी असणार आहे. कारण येणाऱ्या काळात चांगल्या पिकाच्या उत्पादनासाठी कृषी अभियंते शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे दर्जेदार बियाणे आणि लागणारे संसाधने उपलब्ध करून देऊ शकतात. 📝कृषी अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला शिक्षण तसेच कृषी संशोधन, विपणन आणि कृषिमाल विक्री क्षेत्रांमध्ये उत्तम करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. तसेच शेती क्षेत्राशी असलेल्या विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये देखील कृषी अभियंते, मायक्रोबायोलॉजीस्ट, एग्रीकल्चर इन्स्पेक्टर तसेच अग्रोनॉमिस्ट, एग्रीकल्चर क्रॉप इंजिनियर या पदांवर देखील काम करण्याची संधी मिळणे शक्य आहे. 📝कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची प्रक्रिया : कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी एक प्रवेश परीक्षा तुम्हाला द्यायला लागते. यासाठी विद्यार्थ्यांनी बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ म्हणजेच पीसीएम किंवा पीसीबी या विषयांमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. 📝यानंतर तुम्ही कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून डिप्लोमा, बी टेककिंवा इंजीनियरिंग देखील करू शकतात. यामध्ये तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर तीन वर्षाचा असतो आणि इंजिनिअरिंग किंवा बीटेक हे अभ्यासक्रम चार वर्षाचा असतात. बऱ्याच खासगी महाविद्यालयांमध्ये कुठल्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम न घेता सुद्धा प्रवेश दिला जातो. 📝कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच्या संधी : कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रम तर तुम्ही पूर्ण केला तर तुम्हाला नोकरीसाठी खूप सारे ऑप्शन मिळतात. या अभ्यासक्रमानंतर तुम्ही एग्रीकल्चर फर्मस आणि विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये कृषी इंजिनियर, मायक्रोबायोलॉजिस्ट, 📝एग्रीकल्चर इन्स्पेक्टर, अग्रोनोमिस्ट, एग्रीकल्चर क्रोप इंजिनियर आणि संशोधक म्हणून देखील काम करता येऊ शकते. तसेच कृषी क्षेत्रामध्ये शिक्षकतसेच विक्री आणि वितरण म्हणजेच मार्केटिंग क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला चांगली नोकरी मिळणे शक्य आहे. 📝संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
2
इतर लेख