AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषीमाल निर्यात केंद्र जालन्यात सुरू
कृषि वार्ताअॅग्रोवन
कृषीमाल निर्यात केंद्र जालन्यात सुरू
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील काम पूर्ण झालेल्या कृषिमाल निर्यात सुविधा केंद्राची सुरवात शनिवारी करण्यात आली. आंब्यासोबतच द्राक्ष, डाळिंब, केळी, पिकांसाठीही रायपनिंग चेंबर, प्रिकुलिंग, शीतगृह व निर्यातीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निर्यात सुविधा केंद्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमप्रसंगी केली.
याप्रसंगी कृषी भूषण विजयअण्णा बोराडे, बाजार समितीचे उपसभापती भास्करराव दानवे आदी उपस्थित होते. खोतकर म्हणाले, ‘‘जवळपास चौदा वर्षांपूर्वी राज्याच्या कृषी पणन मंडळाने अपेडामार्फत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा निर्यात केंद्राची उभारणी केली होती. समितीकडे १ नोव्हेंबर २०१७ ला या निर्यात केंद्राची सुत्रे आली. त्यानंतर निर्यात केंद्रात आवश्‍यक ते बदल करून घेतले. त्यामुळे आता या केंद्रावरून कृषी माल निर्यातीची संधी प्राप्त होणार आहे. केंद्रावर द्राक्षासाठी आवश्‍यक सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत.`` संदर्भ – अॅग्रोवन, २४ फेब्रुवारी २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0