कृषि वार्तालोकमत
कृषीमंत्रालय पाणी टंचाईमुळे नव्या पीक पध्दतीचा आराखडा तयार करणार
नवी दिल्ली: कृषीमंत्रालय पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या पीक पध्दतीचा आराखडा तयार करत आहे. या आराखडयामध्ये ऊस, भात या प्रकारची जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी तीळ, भाज्या, मका व पारंपारिक पिके घ्यावी, असे सुचविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनदेखील देण्यात येणार आहे. जसे की, शेतकऱ्यांना कमी काळात येणाऱ्या पिकांचा दामही मिळेल असे सांगण्यात आले.
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविला पासवान यांनी आपल्या विभागीय आधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कृषी आणि जल मंत्रालय यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घेतलेल्या बैठकीत ही चर्चा झाली. ऊस व भात ही पिके घेण्यासाठी जास्त पाणी लागते त्यामुळे नदी किनाऱ्यावरील भागातच ही पिके लावण्याचा सल्ला आणि अन्य शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरील तुरीसारखी पिके घेण्याचा सल्ला कृषीविज्ञान केंद्राच्या मदतीने दिला जावा, असा विचार बैठकीमध्ये मांडण्यात आला. त्याचबरोबर दुष्काळी स्थिती व भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळींची आयात करण्यावर चर्चा झाली. संदर्भ – लोकमत, २३ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
65
0
संबंधित लेख