AgroStar
कृषीक्षेत्रात घडणार परिवर्तन
कृषि वार्तासकाळ
कृषीक्षेत्रात घडणार परिवर्तन
नवी दिल्ली: देशाच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तनाला चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, कृषीक्षेत्रात खासगी गुंतवणूकीच्या शक्यता पडताळून पाहणे, ड्रोनसारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग यांसारख्या विविध विषयांवर केंद्र सरकारच्या कृषी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली. निती आयोगात झालेल्या या बैठकीला या समितीचे समन्वयक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, हरियाणा, अरूणाचल प्रदेश, गुजरात आदि राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित होते. यापुढील समितीची बैठक १६ ऑगस्टला मुंबईत होणार आहे. कृषीक्षेत्रातील परिवर्तनाच्या संदर्भात राज्य सरकारांनी आपल्या कल्पना व सूचना ७ ऑगस्टपर्यंत कळविणे अपेक्षित असल्याचे फडणवीस यांनी सांगतिले. संदर्भ – सकाळ, १९ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
51
0
इतर लेख