नोकरीTV9 Marathi
कृषि विद्यापीठात जॉबची मोठी संधी; 35,000 रुपये मिळेल पगार!
➡️डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली रत्नागिरी इथे लवकरच कृषी क्षेत्रातील उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ संशोधन फेलो आणि यंग प्रोफेशनल-I या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. शैक्षणिक पात्रता ➡️वरिष्ठ संशोधन फेलो- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc. इन ऍग्रीकल्चर पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ➡️यंग प्रोफेशनल-I या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc. इन ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.किंवा डिप्लोमा इन ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वरिष्ठ संशोधन फेलो 1)पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी - ३१,०००/- रुपये प्रतिमहिना + १०% HRA 2) तिसऱ्या वर्षी - ३५,०००/- रुपये प्रतिमहिना + 10% HRA यंग प्रोफेशनल-I - २५,०००/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक १)Resume (बायोडेटा) २)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं ३)शाळा सोडल्याचा दाखला ४)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ५)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) ६)पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रमुख अन्वेषक आणि मुख्य कृषी शास्त्रज्ञ कार्यालयात, AICRP, एकात्मिक शेती प्रणाली, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड ➡️अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 डिसेंबर 2021 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
5
इतर लेख