AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ६० टक्के अनुदान!
योजना व अनुदानकृषी जागरण
कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ६० टक्के अनुदान!
देशातील शेतकऱ्यांना विजेच्या अनियमिततेचा जो फटका बसत असतो. यामुळे शेतातील पिके करपून जात असतात परिमाणी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते._x000D_ त्यावर शाश्वत उपाययोजना म्हणून केंद्रसरकारकडून कुसूम योजना चालवली जाते.कुसूम योजनेत सौर उर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे._x000D_ केंद्र सरकार अर्थसंकल्पांतर्गत केलेल्या घोषणेप्रमाणे २०२०-२०२१ मध्ये कुसुम योजनेच्या माध्यमातून २० लाख सौरपंपांना अनुदान देणार आहे. _x000D_ केंद्र सरकारच्या कुसुम योजनेचा फायदा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होणार आहे. अतिरिक्त वीज बनवून शेतकरी ती ग्रीडला पाठवू शकतील. या माध्यमातून त्यांचे उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरणे बसविण्यासाठी केवळ १० टक्के रक्कम द्यावी लागेल. उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून देण्यात येईल. कुसुम योजनेंतर्गत बँका ३० टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देतील. तर सरकार सौर पंपाच्या एकूण खर्चाच्या ६०% रक्कम अनुदान म्हणून देईल._x000D_ असा करा अर्ज_x000D_ १) अर्जदाराने आधी अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/solar/ वर जावे._x000D_ २) त्यानंतर होम पेजवर अर्ज करण्यासाठी क्लिक करा._x000D_ ३) आता तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल._x000D_ ४) अर्जदारास त्याची वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल, जसे की त्यांची वैयक्तिक माहितीः – मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि सबमिट बटणावर क्लिक करा._x000D_ ५) ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल._x000D_ ६) आता भरलेला फॉर्म https://mnre.gov.in/ सब्मिट करावा लागेल._x000D_
संदर्भ -कृषी जागरण, आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
411
12
इतर लेख