सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कुपनलिकेद्वारा भूजल पुनर्भरण
पावसाचे पाणी कुपनलिकेत सोडणे म्हणजे कुपनलिका पुनर्भरण होय. कुपनलिकेच्या जवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे. कुपनलिकेच्या सभोवताली २ मी लांब *२ मी रुंद * २ मी खोल आकाराचा खड्डा खोदावा खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाईप च्या भागात २ ते २.५ सेंमी अंतरावर सर्व बाजूनी ४ ते ५ मि.मी व्यासाची छिद्रे पाडावीत.या छिद्रावर काथ्या घट्ट गुंडाळावा. सर्वात खड्ड्याच्या सर्वात खालच्या भागात दगड विटांचे तुकडे त्याच्या वरच्या भागात खडी नंतरच्या वरच्या भागात जाड वाळू व सर्वात वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी.
पुनर्भरणच्या वेळी घ्यावयाची काळजी
• ओढ्याला येणारे पाणी क्षार व रसायनविरहित असावे.
• पुनर्भरण हे स्वच्छ पाण्याने करावे .
• ज्या क्षेत्रावर क्षार जमा होत असतील तर ते त्या क्षेत्रावरीलपाणी पुनर्भरणास वापरू नये
• औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरू नये.
• सूक्ष्म जीवाणूजन्य तथा रोगराई स्थित क्षेत्रातील पाणी वापरू नये.
अग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस १७ मे १८