गुरु ज्ञानAgrostar
कुकुम्बर मोझॅक व्हायरस रोगाचे नियोजन!
🍅विषाणूजन्य रोग नियंत्रणासाठी कोणत्या प्रकारचे औषध बाजारामध्ये उपलब्ध नाही त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे यासाठी खालीलप्रमाणे नियोजन करावे
1. टोमॅटो लागवडीसाठी योग्य हंगामात योग्य जातींची निवड करावी. यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये लागवड करण्यासाठी सेमिनीस अनसल, सेमिनीस विरांग, सिंजेंटा टीओ 6242 यांसारखे वाण निवडावे एप्रिल ते जून मध्ये लागवड करत असल्यास यूएस 440, सेमिनीस गर्व, सिंजेंटा टीओ 2048 यांसारखे वाण निवडावे. वर्षभर लागवडीमध्ये बायोसिड वीर 2182, सिंजेंटा
अभिनव यासारखे वाण येतात.
2. लागवडीसाठी योग्य वयाची आणि निरोगी रोपे निवडावीत.
3. पिकांची फेरपालट आणि जमिनीची योग्य मशागत करून टोमॅटो पिकाची लागवड करावी
4. टोमॅटो पिकात सापळा पीक म्हणून मका पिकाची लागवड करावी त्यामुळे मावा किडीचा मुख्य पिकावर प्रादुर्भाव रोखला जाईल
5. टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग तसेच ठिबक सिंचनाचा वापर करावा. जेणेकरून कीड प्रतिबंधासोबत पिकाला बळकटी, योग्य पद्धतीने अन्नद्रव्ये आणि पाणी नियोजन करता येईल
6. टोमॅटो लागवडीनंतर त्वरित पिकात कीड प्रादुर्भाव लक्षात येण्यासाठी पिकात पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा
7. लागवडीनंतर रोपे जमिनीत स्थावर झाल्यावर आंतरप्रवाही कीटकनाशकाची आळवणी करावी. जेणेकरून सुरुवातीच्या काळात रसशोषक किड नियंत्रणासाठी मदत होईल
8. रसशोषक किडींना प्रतिबंध म्हणून निम तेलाची फवारणी घ्यावी
9. पीक वाढीच्या अवस्थेत पालाश, स्फुरद, कॅल्शिअम, झिंक, सिलिकॉन यांसारख्या अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर करावा जेणेकरून पीक किड आणि रोगांना जास्त प्रमाणात बळी पडणार नाही.
10. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास योग्य कीटकनाशकांचा वापर करून कीड नियंत्रित ठेवावी
11. विषाणुरोगग्रस्त झाडे आढळून आल्यास त्वरित उपटून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. अश्या पद्धतीने उपायोजना केल्यास नक्क्कीच रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल.
🍅संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.