क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
किसान रेल्वेचा आराखडा तयार करण्यासाठी समितीची निवड
किसान रेल्वेचा आराखडा तयार करण्यासाठी कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय रेल्वेच्या प्रतिनिधींसह आराखडा तयार करण्यासाठी समिती निवडली असल्याचे शासनाने सांगितले. _x000D_ रेल्वे मंत्रालयाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने समिती नेमण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने लोकसभेत दिली. दूध, मांस आणि मासे यासोबत लवकर खराब होणाऱ्या उत्पादनांसाठी शेतकरी अखंडित राष्ट्रीय कोल्ड रेफ्रिजरेटेड साखळी तयार करण्यासाठी पीपीपीमार्फत रेल्वे चालवतील. एक्स्प्रेस आणि सामान नेणाऱ्या ट्रेनमध्ये रेफ्रिजरेटेड डबेही असतील._x000D_ रेल्वे मंत्रालयाने किसान रेल चालविण्यासाठी रेफ्रिजरेटर बोगीचा ताफ खरेदी केला आहे. पंजाबच्या कपूरथळा येथील रेल्वे कोच फॅक्टरीमधून खरेदी केलेल्या या ताफ्यात रेफ्रिजरेटरसह नऊ बोगी आहेत. यापैकी प्रत्येक बोगीची क्षमता 17 टन आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सार्वजनिक खाजगी सहभागाखाली खालावलेली खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी 'किसान रेल' प्रस्ताव मांडला होता. अन्नधान्याच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (पीपीपी) मॉडेलच्या माध्यमातून अर्थसंकल्पात किसान रेल चालवण्याचा प्रस्ताव मांडला होता._x000D_ _x000D_ संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, 4 मार्च 2020 _x000D_ _x000D_ ही महत्वपूर्ण माहिती पसंद पडल्यास लाइक अन् शेअर करा _x000D_
403
0
संबंधित लेख