कृषि वार्ताAgroStar
किसान क्रेडिट कार्ड योजना – अर्ज करा, फायदे मिळवा
किसान क्रेडिट कार्ड योजना – अर्ज करा, लाभ घ्याशेतकऱ्यांना शेतीसाठी सहज कर्ज मिळावे यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC)योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळते, ज्याचा उपयोग ते बी-बियाणे, खास, कीडनाशके, सिंचन, पशुपालन यांसारख्या कृषी कामांसाठी करू शकतात.👉मुख्य लाभ:✅वेळेवर परतफेड केल्यास 3% पर्यंत व्याज सवलत
✅₹1.6 लाखांपर्यंतचे कर्ज गॅरंटीशिवाय
✅पशुपालन व मत्स्यपालन करणारे शेतकरीही पात्र
✅विमा संरक्षण व डिजिटल कार्ड सुविधा👉अर्ज कसा करावा:शेतकरी जवळच्या बँक शाखेत, CSC केंद्रात किंवा अधिकृत शासकीय पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. आवश्यक कागदपत्रे:✅आधार कार्ड
✅जमीनधारक कागदपत्रे
✅बँक खाते तपशील
✅पीक किंवा पशुपालनाचा तपशीलKCC योजनेशी जोडल्यामुळे शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या खर्चांची सोय वेळेत करू शकतात आणि निसर्ग आपत्ती अथवा पीक नुकसान झाल्यास आर्थिक सुरक्षा मिळवू शकतात. अजूनही अर्ज केला नसेल, तर आजच करा आणि लाभ घ्या!👉संदर्भ : AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.