AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 काळी हळद लावा, बक्कळ पैसे कमवा!
नई खेती नया किसानलोकमत
काळी हळद लावा, बक्कळ पैसे कमवा!
➡️जर तुम्ही शेतकरी आहात, किंवा शेतकऱ्यांची मुले आहात तर तुमच्यासाठी एक बिझनेस आयडिया आहे. काळ्या हळदीची शेती जी तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते. चला जाणून घेवूया. ➡️हळदीचे मुळ म्हणजेच कांडी ही आतून काळी किंवा वांग्याच्या रंगाचे असते. काळ्या हळदीमध्ये खूप सारे औषधी गुण आहेत. यामुळे ही हळद सामान्य हळदीपेक्षा जास्त किंमती आहे. याची शेती करून जास्तीचा फायदा कमविता येईल. काळ्या हळदीचा वापर औषधे बनविण्यासाठी केला जातो. कॉस्मेटिक उत्पादने बनविण्यासाठी ही हळद वापरतात. ➡️एवढेच नाही तक भारतात या हळदीचा वापर मांत्रिक-तांत्रिकही करतात (बेकायदा). ही हळद न्युमोनिया, खोकला, ताप, अस्थमा आदी आजारांवर गुणकारी आहे. याशिवाय या हळदीचा लेप डोक्यावर लावल्यास मायग्रेनपासून दिलासा मिळतो. ल्यूकोडर्मा, मिर्गी सारख्या रोगांवरही ही हळद उपायकारक आहे. सौदर्य वाढविण्यासाठी देखील वापरतात. ➡️काळ्या हळदीची शेती ही जून महिन्यात केली जाते. हळद ही पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणावर वाढते. पाणी थांबणाऱ्या जमिनीमध्ये हळद होत नाही. एका हेक्टरमध्ये जवळपास 2 क्विंटल बिया लावल्या जातात. काळ्या हळदीला जास्त पाण्याची गरज नाही. पावसाच्या पाण्यावर ही शेती होते. तसेच किटकनाशक देखील वापरावे लागत नाही. मात्र, चांगल्या उत्पन्नासाठी शेणखत आणि अन्य खते वापरावी लागतात. ➡️एका एकरमध्ये काळ्या हळदीचे ओली ५० ते ६० क्विंटल आणि सुकी १२ ते १५ क्विंटल एवढे उत्पादन आरामात मिळते. काळ्या हळदीचे उत्पादन जरी कमी असले तरी तिची किंमत जास्त आहे. किलोला ५०० रुपये ते ५००० रुपयांचा दर या काळ्या हळदीला मिळतो. म्हणजेच १५ क्विंटलला तुम्हाला आरामात ७.५० लाख रुपये मिळू शकतात. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
90
28
इतर लेख