AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काय आहे पीएम सूर्य घर योजना?
योजना व अनुदानAgrostar
काय आहे पीएम सूर्य घर योजना?
➡️1 फेब्रुवारी रोजी बजेटमध्ये पीएम सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आली. त्यातंर्गत ग्राहकांननी घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यास 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. त्यातून त्यांना वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा होणार आहे. . या मोफत इलेक्ट्रिसिटी योजनेला पीएम सूर्य घर योजना असे नाव देण्यात आले आहे. ➡️सूर्योदय योजनेतंर्गत सरकार एक कोटी घरांवर सौर ऊर्जेसाठी पॅनल बसवणार आहे. त्यासाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. सोलर पॅनलच्या मदतीने मोफत वीज मिळेल. ज्यांच्या घरावरील छतावर सोलर पॅनल बसविता येणार आहे, त्या कुटुंबांना या योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ही योजना गरीब आणि मध्यमवर्गासाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ➡️कोणाला करता येईल अर्ज- - कोणताही भारतीय नागरीक, संस्था. - स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी. - हे घर मजबूत असावे आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी. - अर्जदाराकडे वीज जोडणी असावी. ➡️ अर्ज करण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration लिंक वर क्लिक करा. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
0
इतर लेख