AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काय आहेत बजेटमधील मोठ्या घोषणा!
समाचारDailyhunt
काय आहेत बजेटमधील मोठ्या घोषणा!
"➡️केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ➡️धान्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात - यावर्षी शेतकऱ्यांकडून मोठी धान्यखरेदी करण्यात आली असून धान्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ➡️शेत पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी ड्रोन्सच्या वापर करण्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. ➡️झीरो बजेट फार्मिंगला प्रोत्साहन देण्यासाठी योजना कार्यान्वित केली जाणार आहे. ➡️कृषी आधारीत स्टार्टअपला प्रोस्ताहन देण्यासाठी तसेच नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअप करणाऱ्या युवकांना आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी घोषणा निर्मला सीतारमन यांनी केली आहे. ➡️जलसिंचन योजनेतून ९.६२ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. ६२ लाखांहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्याची योजना देण्यात येणार आहे. ➡️५ नदीजोड प्रकल्पांची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी तब्बल १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ➡️कोरोना काळात इमरजन्सी क्रेडीट लाईन गॅरन्टी स्कीम केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. त्याची लोकप्रियता पाहून इमरजन्सी क्रेडीट लाईन गॅरन्टी स्कीम मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच ५० हजार कोटींची तरतूद यासाठी केली जाणार आहे. ➡️गती शक्ती योजना, ग्रामीण विकासासाठी निधीची तरतूद. ➡️पायाभूत विकासासाठी खासगी गुंतवणूकदारांची मदत घेणार. संदर्भ:-Dailyhunt. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. "
67
3
इतर लेख