AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस लागवडीसाठी महत्वाचे नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
कापूस लागवडीसाठी महत्वाचे नियोजन!
💁🏻‍♂️ऊसासोबतच कापूस हे देखील महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक आहे. त्यामुळे कापूस लागवड करताना पुढील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे 👉अगोदर लागवड केलेल्या शेतात पुन्हा कापूस घेऊ नये म्हणजेच पिकाची फेरपालट करावी जेणेकरून जमिनीचा पोत खराब होत नाही तसेच कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. 👉तसेच कापूस लागवड मध्यम ते भारी तसेच चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. 👉शक्यतो हलक्या जमिनीत कापूस पिकाची लागवड करणे टाळावे अन्यथा पाण्याचा ताण पडून उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता असते 👉जमिनीची मशागत करताना उन्हाळ्यात एक खोलगट नांगरणी करावी व जमीन उन्हात चांगली तापून द्यावी त्यानंतर कापूस लागवडीपूर्वी वखरणी करताना शक्य झाल्यास जास्तीत जास्त सेंद्रिय खत म्हणजेच शेणखताचा वापर करावा. 👉सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाणांची निवड यावर तर खरे उत्पादन अवलंबून असते. आपल्या जमिनीचा प्रकार, पाण्याची सुविधा, वाणाचा पक्वता कालावधी, पुनर्बहराची क्षमता, कीड व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता तसेच बोंडांचे वजन, धाग्याची लांबी आणि रब्बी हंगामातील पिकाचे नियोजन, आंतर पीक या सगळ्या बाबी लक्षात ठेवून वाणांची निवड करावी.👉 कापूस लागवड करताना लवकर येणाऱ्या वाणांसाठी 3 * 1 किंवा 3 * 1.5 फूट, मध्यम कालावधीच्या वाणांसाठी 4*1 किंवा 4*2 फूट तसेच उशिरा येणाऱ्या वाणांसाठी 5*1 किंवा 5*2 फूट अंतर राखावे. 👉बागायती कापूस लागवड हि जून मधील पहिल्या पंधरवड्यात करावी. जिरायती कापूस लागवड ही चांगला पाऊस सुरुवात झाल्यावरच करावी. 👉कापूस पिकातील तण नियंत्रणासाठी कापूस पिकाचे बियाणे लावल्यावर पिकास पाणी देण्यापूर्वी 24 तासांच्या आतमध्ये कोरड्या जमिनीत पेंडीमिथॅलीन 38.7 % सीएस तणनाशक @ 700 मिली प्रति एकर क्षेत्रावर फवारणी करावी व त्यानंतर शेतात पाणी द्यावे. हे तणनाशक गवताच्या बियाण्यावर काम करते जेणेकरून गवत उगवून येत नाही. 👉उभ्या पिकात 2, 4 डी सारख्या तणनाशकांचा वापर करणे टाळावा. अन्यथा पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन पिकाचे नुकसान होते. 👉पीक लागवड केल्यानंतर खतांचे व पाण्याचे चांगले नियोजन तसेच रसशोषक कीड, मर, लाल्या रोग व बोन्ड अळी यांचे सुरुवातीपासून नियोजन करावे. रसशोषक किडींसाठी पिवळे, निळे चिकट सापळे, बोन्ड अळी साठी कामगंध सापळे सुरुवातीपासूनच वापरावे. 👉खतांमध्ये मुख्य अन्नद्रव्यांसोबतच दुय्यम (कॅल्शिअम मॅग्नेशिअम सल्फर) व सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा. 👉मर रोगासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या खतांच्या मात्रासोबतच कॉपर ऑक्सि क्लोराईड आणि कार्बेन्डाझिम यांसारखे बुरशीनाशक जमिनीतून द्यावे. जेणेकरून कापूस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन भेटेल 👉संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
7
इतर लेख