AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस बोंडअळी नियंत्रणासाठी पूर्व हंगाम लागवड टाळा !
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कापूस बोंडअळी नियंत्रणासाठी पूर्व हंगाम लागवड टाळा !
🌱गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढीव होत असून त्याचा कापूस उत्पन्नावर आणि गुणवत्तेवर परिणाम दिसून येत आहे. 🌱कपाशीची फरदड घेणे त्यानंतर पूर्व हंगामी कापूस लागवड अश्या प्रकारे पीक सतत शेती परिसरामध्ये उपलब्ध असल्याने या किडीसाठी खाद्याची उपलब्धता वर्षभर होत राहते. त्यातून त्यांच्या पिढ्या वाढत राहतात. 🌱याकिडीचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी मागील पिकाची अवशेष व्यवस्थित नष्ट करणे. याबरोबरच पूर्व हंगामी कपाशी लागवड करणे टाळावे. 🌱बोंडअळीच्या नियंत्रणासाठी काही उपाययोजना पुढीलप्रमाणे : 👉🏻प्रथम कमी आणि मध्यम परिपक्व होणाऱ्या वाणाची निवड करावी तसेच कपाशीची फरदड घेणे टाळावे. 👉🏻मागील वर्षी ज्या ठिकाणी अळीचा जास्त प्रादुर्भाव झाला आहे, त्याठिकाणी कापूस पिकाची फेरपालट करावी. 👉🏻लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापवून त्यानंतर योग्य मशागत करावी. 👉🏻मागील पिकाचे अवशेष पूर्णपणे नष्ट करणे तसेच कापसाच्या धसकटांचा बांधावर किंवा धुऱ्यावर साठा करू नये. 👉🏻नवीन लागवड हि जून महिन्यामध्ये ८० ते १०० मी. मी. पाऊस झाल्यानंतरच लागवड करावी. 👉🏻आपण निवड केलेल्या वाणा नुसार योग्य अंतरावर लागवड करावी. 👉🏻सापळा पिके म्हणून मका, झेंडू, चवळी, एरंडी या पिकाची लागवड करावी. 👉🏻कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रिफ्यूजी) आश्रित कपाशीची पेरणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
5