गुरु ज्ञानAgroStar
कापूस पीक लागवडीसाठी वाणांची निवड!
🌱कापूस पीक लागवडीसाठी वाणांची निवड करताना काही महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे जेणेकरून निवडलेल्या वाणांमध्ये अधिक उत्पादन मिळण्यासाठी मदत होईल. जमिनीचे विविध प्रकार येतात. त्यामध्ये काळी जमीन, मध्यम प्रकारातील जमिनी, भारी जमीन. यापैकी आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार वाणाची निवड करावी आणि सोबतच पाण्याची उपलब्धता बघणे देखील महत्त्वाचे. पाण्याची उपलब्धता असेल तर बागायती वाण आणि पाण्याची उपलब्धता नसेल, पावसाच्या पाण्यावर कापूस लागवड करत असाल तर जिरायती वाणाची निवड करावी.
🌱आपली जमीन मध्यम ते भारी असेल आणि पाण्याची चांगली उपलब्धता असेल तर आपण ॲग्रोस्टारचे शिवांश आणि पर्ल वाणाची निवड करावी. जर जमीन कोरडवाहू असेल तर ॲग्रोस्टारचे एक्सपर्ट या वाणाची लागवड करावी.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.