AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकासाठी वापरा आधुनिक यंत्रे !
कृषी यांत्रिकीकरणAgrostar
कापूस पिकासाठी वापरा आधुनिक यंत्रे !
➡️ट्रॅक्टरचलित कॉटन प्लान्टर : - ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरद्वारे चालविता येते. - या यंत्राद्वारे कापूस, भुईमूग, सोयाबीन, तूर, मका इत्यादी पिकांची पेरणी करता येते. - एका दिवसात साडेतीन ते ४ हेक्टर क्षेत्रावर टोकण करता येते. - पेरणीच्या अचूकतेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. ➡️सौरचलित बॅटरी फवारणी यंत्र : - फवारणीवेळी सौरऊर्जेवर बॅटरी चार्ज होते. - या फवारणी यंत्रामध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. - या यंत्रासाठी सोलर पॅनल, १२ व्हॉल्टच्या बॅटरीची आवश्यकता असते. - टाकीची क्षमता- १५ लिटर. ➡️पॉवर विडर : - या यंत्राला स्वतंत्र्य रोटाव्हेटर आहे. - कापूस पिकातील तण काढण्यासाठी उपयुक्त. - चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे तण निर्मूलन प्रभावीरीत्या होते. ➡️नॅपसॅक मिस्ट ब्लोअर कम डस्टर : - कापूस पिकांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणीसाठी उपयोग केला जातो. - हे यंत्र हातळण्यास सोपस्कर असून पेट्रोल इंजिनद्वारे चालते. - पाण्याच्या आणि भुकटीच्या स्वरूपात कीटकनाशकांचा वापर करता येतो. - फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत होते. - टाकीची क्षमता - ११.५ लिटर ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
12
इतर लेख