AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकासाठी लागवडीपूर्वी मशागत!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकासाठी लागवडीपूर्वी मशागत!
➡️ कापूस पिक सुमारे 5 ते 7 महिने शेतात राहत असल्यामुळे जमिनीची निवड आणि योग्य मशागत ह्या अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. पिकाच्या भरगोस उत्पादनासाठी कपाशीची लागवड ही काळ्या, मध्यम ते खोल व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. तसेच कपाशीच्या झाडाचे मुळे जमिनीत 60 ते 90 सेंमी पर्यंत खोल जातात त्यामुळे मशागत करताना 1 खोलगट नांगरणी व 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत व आधीच्या पिकाचे अवशेष नष्ट करून जमिनीत चांगले कुजलेले शेणखत 3 ते 4 टन टाकावे. आधीच्या पिकाचे अवशेष नष्ट केल्यामुळे कीड व रोगाची सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
4