AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण
गेल्या काही वर्षांपासून, गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. या किडीने कळ्या, फुले यांवर घातलेली अंडी सहसा उघड्या डोळ्यांनी दिसून येत नाही. यानंतर ही अंडी उबून अळ्या फुले, कळ्या आणि बोंडांमध्ये प्रवेश करतात आणि आतील भाग खातात. संक्रमित फुले गुलाबाच्या फुलांप्रमाणेच दिसतात. प्रादुर्भावग्रस्त फुले, कळ्या आणि लहान बोंडे खाली गळून पडतात. अळी बोंडांमध्ये देखील प्रवेश करून तंतू आणि बियादेखील नष्ट करतात.
व्यवस्थापन:_x000D_ • बोंड अळीच्या पतंगाचा प्रादुर्भाव जाणून घेण्यासाठी प्रति हेक्टरी ५ फेरोमन सापळे बसवावेत. तीन दिवसांमध्ये ८ किंवा त्यापेक्षा अधिक पतंग सापळ्यामध्ये आढळल्यास याच्या नियंत्रणासाठी १५-२० प्रति हेक्टरी सापळे बसवावे._x000D_ • आपल्या पिकातील कोणत्याही २० झाडाची पाहणी करावी. जर १०० कळ्या, फुल किंवा बोंडांवर ५ अळ्या आढळल्यास पुढीलपैकी कीटकनाशकाची फवारणी करावी._x000D_ • जे बियाणे उत्पादन म्हणून कापसाची लागवड करतात, त्यांना प्रादुर्भावग्रस्त फुले नष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. _x000D_ • कीटकनाशकाच्या वापरापूर्वी प्रादुर्भावग्रस्त फुलांच्या कळ्या गोळा करून नष्ट कराव्या._x000D_ • बोंड अळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस आणि असिफेट यासारख्या कीटकनाशकांची वारंवार फवारणी करावी._x000D_ • कापणी केलेला कापूस साठवून न ठेवता बाजारात विकावा._x000D_ • शेवटच्या वेचणीनंतर झाडे मुळासकट उपटून काढा आणि त्यांचा नाश करा किंवा सेंद्रिय खते तयार करण्यासाठी वापरा._x000D_ • जर हा प्रादुर्भाव जास्तच राहिला, तर सिंचन रोखून पीक संपवावे._x000D_ • बोंड अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरँट्रनिलिप्रोल ९.३% + लॅम्डा सायहॅलोथ्रीन ४६% झेडसी @५ मिली किंवा सायपरमेथ्रीन १० ईसी @ १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ ईसी @१० मिली किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रीन २.५ ईसी @१० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी @५ मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ एससी @५ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ एससी @३ मिली किंवा डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफॉस ३५% ईसी @१० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५ ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
550
1