AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील सफेद माशी कीड नियंत्रण
गुरु ज्ञानAgroStar
कापूस पिकातील सफेद माशी कीड नियंत्रण
👉सफेद माशी, मावा, फुलकिडे आणि तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिवस-रात्रीच्या तापमानातील तफावतीमुळे होतो. या किडी पानांच्या खालच्या बाजूस रस शोषून पानांवर मोठे परिणाम करतात. पानांचे आकसणे, कोकडणे, लालसर व ठिसूळ होणे, तसेच पाने वाळण्यास कारणीभूत ठरतात. लहान पिलांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या गोड चिकट पदार्थामुळे बुरशीची लागण होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन प्रभावित होते. 👉किडींचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यासाठी पायरिप्रॉक्सिफेन 5% + डायफेनथुरॉन 25% एसइ घटक असणारे ऍडोनीक्स कीटकनाशक वापरणे अत्यंत प्रभावी ठरते. या कीटकनाशकाचे प्रमाण प्रति लिटर पाण्यात 2.5 मिली घेतल्यास फवारणीद्वारे किडींवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. फवारणी केल्याने कीड नियंत्रणात राहते आणि पिकाची वाढ व उत्पादन सुधारते. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख