गुरु ज्ञानAgrostar
कापूस पिकातील लाल्या रोग नियंत्रण!
🌱सध्या कापूस पिकामध्ये पाने लाल होण्याची समस्या सुरू झाली आहे. या रोगाची दोन प्रमुख कारणे आहेत.
👉पिकामध्ये तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाल्यास आणि दुसरे म्हणजे अन्नद्रव्ये कमतरता मुख्यत्वे नायट्रोजन व मॅग्नेशियम.कापूस पिकावर लालसर पना कशामुळे आला आहे हे ओळखून नियंत्रण करणे गरजेचे आहे.
👉लाल होण्याचे कारण तपासण्यासाठी, तळहातावर लाल पाने ठेवा आणि मुठ बंद करा आणि नंतर मुठ सोडा. जर पानांचे लहान तुकडे पडल्यास पिकामध्ये तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आहे असे समजावे तसेच मूठ उघडल्यास पान आपल्या तळहातावर तुकडे न होता सपाट राहिल्यास अन्नद्रव्ये कमतरता या कारणांमुळे ते लाल होत आहे असे समजावे.
👉दुसरा पर्याय तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीला पानांच्या कडा पिवळ्या कालांतराने विटकरी होतात आणि मग संपूर्ण पान करपून नंतर पानांची गळ देखील होते तसेच मॅग्नेशियम अन्नद्रव्याची कमतरता असल्यास संपूर्ण पानाला लालसर पणा आलेला दिसतो. एकदा पाने लाल झाल्यानंतर ती पुन्हा हिरवी होत नाही आणि याचा परिणाम पिकाच्या अन्ननिर्मितीवरती होऊन उत्पादनावरती होतो.
🌱यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना करावी:
✔ रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी जसे की क्रुझर, किल-एक्स, ऍग्रोअर, एजीटेट गोल्ड इत्यादी पैकी एक
किंवा प्रादुर्भाव पाहून आलटून पलटूनअधिक कीटकनाशकांचा वेळोवेळी वापर करावा.
✔ नत्र, मॅग्नेशियम व इतर अन्नद्रव्ये कमतरता भासू नये यासाठी खतांची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी.
✔ शेतात पाणी साचल्यास त्वरीत चर काढून ते शेताबाहेर काढून द्यावे. पाणी साचल्यामुळे मॅग्नेशियम आणि
इतर सूक्ष्म पोषक पिकांद्वारे शोषले जात नाहीत.
✔ पावसाने बराच काळ उघडीप दिल्यास संरक्षित पाणी द्यावे.
✔ मॅग्नेशियम सल्फेट @ 45 ग्रॅम, फ्लोरोफिक्स @ 25 ग्रॅम व 13:00:45 @ 45 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात
मिसळून एकत्रीत फवारणी करावी अथवा मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो एकरी खतांसोबत जमिनीतूनही वापर
करू शकतो
🌱संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा