AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील लाल्या रोग तसेच त्याचे नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील लाल्या रोग तसेच त्याचे नियंत्रण
सध्या कापूस पिकामध्ये पाने लाल होण्याची समस्या सुरू झाली आहे. या रोगाची दोन प्रमुख कारणे आहेत; एक, जर तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात नसल्यास आणि दुसरे म्हणजे पर्यावरणाची स्थिती आणि मुख्य / सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता. जर रात्रीचे तापमान २१ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी झाले तर पाने पुन्हा लाल होण्यास सुरूवात होते. लाल होण्याचे कारण तपासण्यासाठी, तळहातावर लाल पाने ठेवा आणि मुठ बंद करा आणि नंतर मुठ सोडा. जर पानांचे लहान तुकडे पडल्यास पिकामध्ये तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आहे आणि या वेळेत नियंत्रित करणे आवश्यक आहे. तसेच मूठ उघडल्यास पान आपल्या तळहातावर सपाट राहिल्यास, अन्नद्रव्ये कमतरता या कारणांमुळे ते लाल होत आहे असे समजावे. सुरुवातीला पानांच्या कडा पिवळ्या होतात आणि मग पानांच्या शिरा दरम्यानची जागा लाल होते आणि शेवटी पाने गळतात. तुडतुडे किडींच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे. एकदा पाने लाल झाल्यानंतर ती पुन्हा हिरवे होऊ शकत नाहीत.
नियंत्रण:-_x000D_ १. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकांचा वेळोवेळी वापर करावा._x000D_ २. नत्राचा अतिरिक्त डोस देऊन झाडांना पुरेसे नायट्रोजन द्यावे. १० दिवसानंतर दररोज १ ते १.५% युरिया २ ते ३ वेळा फवारणी करावी. युरियाऐवजी डीएपी @ २% देखील फवारणी केली जाऊ शकते._x000D_ ३. मॅग्नेशियमची कमतरता रोखण्यासाठी आठवड्यातून एकदा मॅग्नेशियम सल्फेट @२० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._x000D_ ४. जमिनीत ओलावा नसल्यास तातडीने पाण्याचे नियोजन करावे._x000D_ ५. पाणी देताना एकाच ठिकाणी पाणी स्थिर राहू नये याची काळजी घ्या. पाणी साचल्यामुळे मॅग्नेशियम आणि इतर सूक्ष्म पोषक पिकांद्वारे शोषते जात नाहीत._x000D_ ६. आवश्यक असल्यास एस्कॉर्बिक अॅसिड ५०० पीपीएम + पीएमए १० पीपीएम फवारणी करावी._x000D_ ७. दरवर्षी ही समस्या कायम राहिल्यास पुढील वर्षी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे._x000D_ ८. शेतकर्यांनी शेतातील कोणत्याही सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता जाणून घेण्यासाठी, माती परीक्षण प्रयोगशाळांमध्ये माती परीक्षण करून घ्यावे._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस_x000D_ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर, फोटोखाली दिलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा!_x000D_
440
5