AgroStar
कीट जीवन चक्रकॉपर्ट बायोलॉजिकल सिस्टीम
कापूस पिकातील मावा किडीचे जीवनचक्र!_x000D_
आर्थिक महत्त्व: - मावा किडीचे नवजात पिले व प्रौढ कापूस पिकाचे कोवळी पाने, फुले कोवळ्या फांद्यामधील शोषून पिकांचे नुकसान करतात.आणि पानांवरही रसस्त्राव करतात. यावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचा प्रादुर्भाव वर्षभर कायम राहतो. या किडीमुळे ५०% पर्यंत नुकसान होते._x000D_ _x000D_ जीवन चक्र: -_x000D_ शिशु: - सुरुवातीच्या काळात हे किडे पानांच्या खालच्या बाजूला दिसतात. जिथे बसून पानांचा रस शोषून घेतात. यात मादी किडींची संख्या जास्त आहे. मादी कीड थेट नवजात पिलांना जन्म देतात. पिले ३-६ दिवसात प्रौढ होतात._x000D_ _x000D_ प्रौढ: - प्रौढ कीटक पंख आणि पंख नसलेले असतात. त्यांचा रंग हिरवा आणि फिकट राखाडी आहे._x000D_ _x000D_ नियंत्रण: - या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ऑक्सिडामेटन - मिथाइल २५% ईसी @ १००० मिली ५००-१००० लिटर पाणी, थायोमिथॉक्सम २५ डब्ल्यूजी @ ५०-१०० ग्रॅम ५००-१००० लिटर पाणी, एसीटामिप्रिड १.१% + सायपरमेथ्रीन ५.५% ईसी @ १७५- ५०० मिली लिटर पाण्यात २०० मिली मिसळून प्रति हेक्टर फवारणी करावी._x000D_ टीप: - औषधांचे प्रमाण वेगवेगळ्या पिकांनुसार बदलते._x000D_
संदर्भ:- कॉपर्ट बायोलॉजिकल सिस्टीम हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
21
1
इतर लेख