AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील मर रोग समस्या!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील मर रोग समस्या!
कापूस पिकात पाण्याचा ताण बसून अचानक अतिरिक्त पाणी दिल्यामुळे अथवा पावसामुळे जमिनीत वाफसा स्थिती राहत नाही परिणामी जमिनीत हवा खेळती न राहिल्याने झाडात अन्नद्रव्ये आणि पाणी वहन क्रियेत अडथळा येऊन झाडाच्या मुळीला तणाव येऊन झाड अचानक सुकते व बुरशीचा प्रादुर्भाव होऊन मर लागायला चालू होते. यावर उपाययोजना म्हणून जमिनीत जास्त पाणी झाल्यास पाण्याचा लगेच निचरा करावा. त्यानंतर जमिनीतील ओलावा कमी करून वाफसा येण्यासाठी जमिनीतून अमोनिअम सल्फेट किंवा सल्फर यांसारख्या रासायनिक खतांचा वापर करावा सोबतच मुळीला चालना मिळण्यासाठी आणि बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खतांसोबत ह्युमिक आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक मिसळून द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
109
17