गुरु ज्ञानAgrostar
कापूस पिकातील पुर्नबहार/फरदड नियोजन!
🌱कापूस पिकामध्ये फरदड किंवा पुर्नबहार नियोजन करत असताना आधीच्या पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्यास कापूस फरदड घेणे टाळावे.
🌱खरिफ मधील कापूस वेचणी करताना कीड रोग ग्रस्त व अपरिपक्व बोंडे काढून टाकावीत व कपाशीची 5 फुटापेक्षा जास्त वाढ झाली असल्यास थोडा शेंडा खुडावा जेणेकरून बाजूने नवीन फुटवे व पात्यांची संख्या वाढेल.
🌱तसेच तण नियंत्रण करून जमीन भुसभुशीत करण्यासाठी हलकी वखरणी करावी. तणविरहित शेतामध्ये खतांची मात्रा द्यावी. यामध्ये 10:26:26 - 50 किलो,
युरिया 25 किलो, मॅग्नेशिअम सल्फेट 10 किलो, ह्युमिक 500 ग्रॅम /एकर व सल्फर मॅक्स 3 किलो एकरी द्यावे. खतांची मात्रा दिल्यानंतर पिकास दुसऱ्या दिवशी मुबलक प्रमाणात पाणी द्यावे.
🌱संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.