AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण!
सध्या कापूस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पांढऱ्या माशीची पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. परिणामी, पाने कोमेजतात. याचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने लालसर ढिसूळ होऊन शेवटी वाळतात. याशिवाय पिल्ले त्यांच्या शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे संपूर्ण झाड चिकट व त्यावर बुरशी वाढून काळसर होते. त्यामुळे पानाच्या अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन झाडावर विपरित परिणाम होतो. पात्या, फुले कमी येतात, पाने वाटीच्या आकारासारखी होतात. याच्या नियंत्रणासाठी अ‍ॅसिटामाप्रिड २०% एसपी @ २० ते ४० ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूएस @ १४० ग्रॅम किंवा फ्लोनिकामाईड ५०% डब्ल्यूजी @६० ग्रॅम किंवा डायफेंथ्यूरॉन ५०% डब्ल्यूपी @२४० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
87
25