गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील दहिया रोगाचे नियंत्रण !
🌱दहिया रोगालाच ग्रे मिल्डयू नावाने देखील ओळखले जाते. पावसाळ्यात पडणारा रिमझिम पाऊस, सतत
ढगाळ वातावरण, हवेतील अधिक आद्रता यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव अधिक वाढतो. जुन्या पानांवर पांढऱ्या बुरशीची
वाढ झालेली दिसते. रोगग्रस्त पाने दही शिंपडल्यासारखे दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने करपून
लालसर तपकिरी रंगाची होतात आणि गळतात. यामुळे पिकाची उत्पादकता कमी होते.
🌱नियंत्रणासाठी सुरुवातीला रोगाचा प्रादुर्भाव आढळ्यास कार्बेन्डाझिम 12% व मॅन्कोझेब 63% डब्लुपी घटक असणारे
मँडोझ बुरशीनाशक @ 2 ग्रॅम प्रति लिटर किंव्हा प्रोपीनेब 70% डब्लुपी घटक असणारे अँट्राकॉल बुरशीनाशक @ 2 ग्रॅम प्रति लिटर घेऊन फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास मेटीराम 55% + पायरॅकलोस्ट्रोबीन 5% डब्लू जी घटक असणारे कॅब्रिओटॉप बुरशीनाशक @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर घेऊन फवारणी करावी.
🌱संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.