AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकाचे रसशोषक किडींपासून संरक्षण!
गुरु ज्ञानAgrostar
कापूस पिकाचे रसशोषक किडींपासून संरक्षण!
🌿कापूस पीक लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेत आळवणी किंवा ड्रेंचिंग करणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमिनीतील तसेच पानांवर येणाऱ्या रस शोषक किडींच्या प्रतिबंधासाठी थायमेथाक्साम 75% एसजी घटक असणारे शटर कीटकनाशक 100 ग्रॅम, सफेद मुळीचा विकास होऊन अन्नद्रव्यांचा अपटेक चांगला होण्यासाठी ह्यूमिक पावर 400 ग्रॅम आणि बियांची चांगली उगवण आणि अंकुरण होण्यासाठी, तसेच दुष्काळ परिस्थिती मध्ये पीक तग धरण्यासाठी व ताण तणाव दूर होऊन रोपांच्या जोमदार वाढीसाठी प्लॅंटीगेन डीएस 50 ग्रॅम एकरी 150 ते 200 लिटर पाणी घेऊन जमिनीमध्ये वापसा असताना पंपाचा पुढील नोझल काढून गोल बांगडी पद्धतीने आळवणी करावी. उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी कापूस लागवडी नंतर 12 दिवसांपासून 25 दिवसांपर्यंत आळवणी करणे आवश्यक आहे आणि औषध रोपांवरती पडणार नाही याची काळजी घ्यावी. 🌿संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
3
इतर लेख