गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकांमधील मर आणि जिवाणूजणन्य करपा व्यवस्थापन !
🌱आकस्मिक मर : काही ठिकाणी कपाशीमध्ये मोठ्या उघाडी नंतर पाऊस झाल्यास आकस्मिक मर ही विकृती दिसून येत आहे. त्याकरिता शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया अधिक १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली आळवणी करावी. किंवा १ किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.
🌱जिवाणूजणन्य करपा : जिवाणूजन्य करपा व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० टक्के हे बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ५०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.
🌱संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा