AgroStar
कापूस निर्यातीत ३० टक्के वाढ होण्याची शक्यता
कृषि वार्तासकाळ
कापूस निर्यातीत ३० टक्के वाढ होण्याची शक्यता
देशातून २०१७-१८ या हंगामात कापसाची गेल्या चार वर्षांतील विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. कापूस निर्यातीत आधीच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३० टक्के वाढ होऊन ती ७५ लाख गाठींपर्यंत पोचण्याची शक्यता आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. जागतिक बाजारात भडकलेल्या किमती आणि कमजोर रुपया यामुळे देशातील कापूस निर्यातीला बळ मिळाले आहे.
कापूस निर्यातीसाठी मोठी मागणी असली तरी हंगाम संपत आल्याने चांगल्या गुणवत्तेच्या कापसाची उपलब्धता मर्यादीत आहे, असे गणात्रा म्हणाले. पाकिस्तान, बांगलादेश, चीन आणि व्हिएतनाम हे देश भारतीय कापसाचे प्रमुख खरेदीदार आहेत. संदेभ - सकाळ ४ जून १८
147
0
इतर लेख