AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस गुलाबी बोंडअळी मुळे होणारे नुकसान आणि व्यवस्थापन !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस गुलाबी बोंडअळी मुळे होणारे नुकसान आणि व्यवस्थापन !
➡️सध्या कापूस पिक पात्या,फुले लागण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची सुरुवात प्रामुख्याने पात्या, फुले लागण्याच्या अवस्थेत होते. साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात हिरव्या बोंडावर आढळतो. तसेच उशिरा तयार होणाऱ्या कापूस जाती या किडीस जास्त बळी पडतात. कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक नियोजन करणे फायदेशीर ठरते. ➡️गुलाबी बोंडअळी मुळे होणारे नुकसान : 1. गुलाबी बोंडअळी अंड्यातून निघुन ताबडतोब कळ्या, फुले व बोंडाना छोटे छिद्र करून आत शिरते. सुरुवातीला अळ्या पाते, कळ्या, फुलांवर उपजीविका करतात. 2. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमलेलल्या कळीसारखी दिसतात, अशा कळ्यांना डोमकळया म्हणतात. 3. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होता फुटतात व गळून गेलेली बोंडे सडतात. 4. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तिच्या विष्ठेने व बोंडाच्या बारीक कणाच्या सहाय्याने छिद्र बंद करते. ज्यामुळे बोंडाचे वरुन निरीक्षण केल्यानंतर अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही. या अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. 5.शेंदरी (गुलाबी) बोंडअळी सरकीचे नुकसान करते. बोंडाची वाढ खुंटते, बोंडे पूर्णपणे फुटत नाहीत. सरकी किडलेली असल्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते तसेच धाग्याची लांबी, मजबूती आणि गुणवत्ता कमी होते. ➡️गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन : 1.कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान दहा पक्षीथांबे उभे करावेत. म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया टिपून खातील. 2. कापूस पीक पात्या लागण्याच्या अवस्थेत असताना शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा नीम तेल ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 3.पतंगांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप ल्युर सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत. आर्थिक नुकसान पातळी (सलग तीन रात्री ८ पतंग/सापळा/रात्र) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी. 4. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात. १०% डोमकळ्या ही आर्थिक नुकसान पातळी समजून फवारणीचे उपाय करावेत. 5. हिरवी बोंडे लागल्यानंतर अनिश्चित स्वरूपात एकरी २० बोंडांचे (१ बोंड/झाड) निरीक्षण करावे. 6. बोंडअळ्यांची अंडी किंवा प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या पिकावर दिसून येताच ट्रायकोग्रामा बॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोणीस या परोपजीवी किटकाची १ ते १.५ लाख अंडी प्रति हेक्टर (३ ट्रायकोकार्ड प्रती एकर) या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने तीन वेळा कपाशी शेतात सोडावीत. 7. जैविक घटकांचा कीड नियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. 8. किडीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर कपाशीच्या वाढीनुसार गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली कीटकनाशके (फवारणी प्रति एकर) क्विनॉलफॉस (२५ एएफ) ४०० मि.लि, थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) ४०० ग्रॅम , क्लोरपायरीफॉस (५० ईसी) ४०० मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ६०० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३० अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६० हे किडकनाशक १०० मिली प्रति एकर फवारणी करावी. ➡️संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
30
7
इतर लेख