क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस काढणी भाग - २ : कपाशीची प्रतवारी
कापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळवण्यासाठी व शेतकऱ्यास त्याने उत्पादित केलेल्या कापसाला योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते. प्रतवारी म्हणजे उत्पादित मालाचे ठरवून दिलेल्या गुण वैशिष्ठ्यांचे आधारावर त्याचे विभिन्न गट करणे होय. 👉 कापसाची प्रत ठरविणे : कापूस वाण निश्चित केल्यानंतर त्याची प्रत ठरविणे आवश्यक आहे. प्रत ठरवितांना कापसाचा रंग, स्वच्छता, रुईचे प्रमाण, स्पर्श, धाग्याची ताकद, लांबी, कापसातील पत्ती, काडीकचरा, माती इत्यादीचे प्रमाण, कापसात असलेले अपरिपक्व व पिवळी टिक असलेल्या कापसाचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण विचारात घेतले जाते. 👉 कापसाचा रंग : प्रत्येक वाणाच्या कपाशीस विशिष्ठ प्रकारचा रंग असतो. उत्तम प्रतीच्या कपाशीस त्या वाणांचा मुळ रंग दिसून येतो. कापसाची प्रत हलकी असल्यास किंवा पावसाने कापूस भिजला गेल्यास त्याचा परिणाम कपाशीच्या रंगावर होतो, त्यामुळे रुइमधे लाल पिवळसर रंगाची रुई आढळल्यास अशा रुईला बाजारपेठेत कमी भाव मिळतो. 👉 कापसाची स्वच्छता : कपाशीची वेचणी करतांना झाडाची पत्ती, पालापाचोळा चिकटून येतो, काही वेळा नख्यासह कापसाचे बोंड वेचणी केले जाते. अशा प्रकारच्या विक्रीस आणलेल्या कपाशीमध्ये झाडाची पाने, पालापाचोळा, नख्या, माती इ. अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतीवर परिणाम होतो. 👉 तंतूची लांबी : सर्वासाधारानपणे कापसाची गलाई झाल्यानंतर त्यापासून मिळालेल्या रुईतील थोडा भाग घेऊन हाताने त्यातील धागे ओढून किंवा प्रयोगशाळेत विशिष्ठ उपकरणांद्वारे धाग्याची लांबी ठरविण्यात येते. परंतु विक्रीस मोठ्या प्रमाणात असलेल्या कापसाच्या तंतूची लांबी काढण्यासाठी प्रत्येक गाडीतील कापूस गलाई करून त्याची लांबी काढणे शक्य होत नसते. 👉 तंतूची ताकद : विक्रीस आणलेल्या कापसापैकी काही कापूस हातात घेऊन दुसऱ्या हाताने त्यातील तंतू वेगळे करून व तंतुना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकद ठरविली जाते. चांगली, मध्यम व कमी अशा प्रकारे धाग्याच्या ताकदीचे प्रकार करून कापसातील परिपक्व ए अपरिपक्व कापसाचे प्रमाण ठरविण्यात येते. तंतुच्या लांबी प्रमाणे ताकदीवर भर देण्यात येतो. 👉 कापसाच्या तंतूची परिपक्वता : विक्रीस आणलेला कापूस पूर्णतः परिपक्व, अर्धपरीपक्व वा अपरिपक्व आहे हे तपासणे आवश्यक असते. परिपक्वतेवर कापसातील रुईचे प्रमाण अवलंबून असते व रुईच्या प्रमाणाचा अंदाज कापूस हातात घेतल्यानंतर करता येतो. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
0
संबंधित लेख