AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडी वर्गीय पिकातील मोझॅक व्हायरस नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
काकडी वर्गीय पिकातील मोझॅक व्हायरस नियंत्रण!
🌱काकडीवर्गीय पिकात मोझॅक हा विषाणूजन्य रोग आढळून येतो. याच्या प्रादुर्भावामुळे पानांवर तसेच फळांवर गडद हिरव्या आणि फिक्कट हिरव्या रंगाचे चट्टे आढळून येतात तसेच झाडाची वाढ खुंटणे, फुलधारणा न होणे, फळांची गुणवत्ता खालावणे अश्या समस्या येतात. 🌱हा विषाणूजन्य रोग पिकात आल्यावर तो नियंत्रणात येत नाही मात्र हा रोग मावा ह्या किडीमुळे पसरला जातो. त्यामुळे पीक लागवड केल्यावर सुरुवातीला पिकात पिवळे व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर कीड नियंत्रणासाठी करावा. तसेच किडीचा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 70 % डब्लूजी घटक असलेले कीटकनाशक @ 0.35 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारावे. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख