अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडी वर्गीय पिकातील मोझॅक व्हायरस नियंत्रण!
काकडीवर्गीय पिकात मोझॅक हा विषाणूजन्य रोग आढळून येतो. याच्या प्रादुर्भावामुळे पानांवर तसेच फळांवर गडद हिरव्या आणि फिक्कट हिरव्या रंगाचे चट्टे आढळून येतात तसेच झाडाची वाढ खुंटणे, फुलधारणा न होणे, फळांची गुणवत्ता खालावणे अश्या समस्या येतात. हा विषाणूजन्य रोग पिकात आल्यावर तो नियंत्रणात येत नाही मात्र हा रोग मावा ह्या किडीमुळे पसरला जातो. त्यामुळे पीक लागवड केल्यावर सुरुवातीला पिकात पिवळे व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर कीड नियंत्रणासाठी करावा. तसेच किडीचा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 70 % डब्लूजी घटक असलेले कीटकनाशक @ 0.35 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
5
संबंधित लेख