AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडी पिकात अधिक फळधारणा होण्यासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
काकडी पिकात अधिक फळधारणा होण्यासाठी उपाययोजना!
➡️ काकडी पिकात मादी कळीची संख्या जास्त असल्यास अधिक फळधारणा होऊन उत्पादन वाढते. परंतु खतांचे, पाण्याचे असंतुलित प्रमाण आणि वेळीच कीड रोग व्यवस्थापन केले नाही तर काकडी पिकात फुलांची आणि फळाची सेटिंग न होता फुले आणि लहान फळे जळून जातात अथवा मादी कळी कमी प्रमाणात लागते. ➡️ यावर उपाय म्हणून सुरुवातीपासून पिकास संतुलित प्रमाणत खते आणि पाणी द्यावे. तसेच फुलोरा अवस्थेत वेलीवर बोरॉन 1 ग्रॅम अधिक चीलेटेड कॅल्शिअम 0.75 ग्रॅम आणि अल्फा नेफथॅलिक असेटिक ऍसिड घटक असलेले होल्ड ऑन @ 0.25 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी जेणेकरून पिकात मादी कळीची संख्या वाढेल सोबतच अधिक फळ सेटिंग होण्यास मदत होईल. ➡️ वरील फवारणी करण्यापूर्वी पिकावर असलेल्या कीड व रोगाचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रित ठेवावा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
10
1