AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांद्याला 😳एवढा दर!
बाजार बातम्याअ‍ॅग्रोवन
कांद्याला 😳एवढा दर!
➡️ परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २००० रुपये, तर सरासरी १७५० रुपये होते. सोलापुरात क्विंटलला १५०० ते ३००० रुपये ➡️ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपयांपर्यंत, तर सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. औरंगाबादमध्ये क्विंटलला ४०० ते २२०० रुपये ➡️ औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची ९१५ क्विंटल आवक झाली. त्यास ४०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. नागपुरात क्विंटलला १५०० ते २५०० रुपये ➡️ नागपूर : नागपूरच्या महात्मा फुले बाजारपेठ तसेच कळमना बाजार समितीत पांढऱ्या व लाल कांद्याची आवक नियमित होत आहे. कळमना बाजार समितीत दोन्ही कांद्याची सरासरी प्रत्येकी एक हजार क्विंटल आवक असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. ➡️ डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला ही आवक दोन हजार क्विंटलपर्यंत होती. लाल कांद्याला १५०० ते २५०० रुपये आणि पांढऱ्या कांद्याला ३५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आवक कमी झाल्याचे सांगण्यात आले.लाल कांद्याचे व्यवहार १५०० ते २५०० रुपयांनी होत आहेत.पांढऱ्या कांद्याचे दर २५०० ते ३००० रुपये क्विंटल आहेत. नागपूरच्या किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. नांदेडमध्ये क्विंटलला १००० ते २५०० रुपये ➡️नांदेड येथील बोंढार बाजारात बुधवारी कांद्याची आवक २०० टन झाली. त्यास १००० ते २५०० रुपये दर मिळाल्याची माहिती ठोक व्यापारी युनूस बागवान यांनी दिली. जळगावात क्विंटलला ३०० ते १००० रुपये ➡️ जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याची ११०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ३०० ते १००० सरासरी ५०९ असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जळगाव, धुळे, साक्री आदी भागातून होत आहे. सांगलीत क्विंटलला ७०० ते २८०० रुपये ➡️ सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला बाजार आवारात गुरुवारी कांद्याची १४४१ क्‍विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २८००, तर सरासरी १७५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. संदर्भ:-,अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
42
2
इतर लेख