AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांद्याच्या साठ्यातील मर्यादा सरकारने कमी केली
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कांद्याच्या साठ्यातील मर्यादा सरकारने कमी केली
कांद्याचे दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने किरकोळ विक्रेत्यांसाठी कांद्याच्या साठ्यांची मर्यादा 5 टन वरून 2 टन केली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी जमाखोरी सोडविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचेही केंद्राने राज्यांना निर्देश दिले आहेत. केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, खुल्या बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या साठवणुकीत आणखी सुधारणा केली आहे. तसेच सर्व राज्य सरकारांना साठ्यांवर छापे टाकून इतर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे.
या महिन्याच्या सुरूवातीस, केंद्र सरकारने किरकोळ कांदा विक्रेत्यांची साठा मर्यादा 10 टन वरून 5 टन केली. या कालावधीत घाऊक विक्रेत्यांसाठी कांदा साठवण्याची मर्यादा 50 टन वरून 25 टन करण्यात आली. कांद्याच्या दरातील वाढीस सामोरे जाण्यासाठी सरकारने 36,090 टन कांद्याची आयात करण्यास मान्यता दिली आहे, त्यातील 21,090 टन कांद्याची आयात यापूर्वी झाली आहे, त्यापैकी 6,090 टन कांदे इजिप्तमधून तर 15,000 टन कांदे तुर्की येथून आयात करण्यात आले. केले जाईल संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, 10 डिसेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
102
0