गुरु ज्ञानAgroStar
कांदा साठवणूक करण्याची योग्य पद्धत!
🌱रब्बीच्या कांद्याची काढणी झाली असेल. हा कांदा चाळीमध्ये टिकवून ठेवण्यासाठी साठवण्याच्या अगोदर चाळ निर्जंतुक करण्यासाठी चाळीमध्ये क्लोरोडस्ट 5 किलो, कार्बेन्डाझिम 50% WP घटक असणारे बुरशीनाशक 500 ग्रॅम आणि 90% सल्फर 3 किलो प्रति 15 ते 20 टन कांद्यासाठी यांची एकत्रित चाळीमध्ये धुरळणी करावी आणि नंतर कांदा साठवावा जेणेकरून कांदा चाळीमध्ये खराब न होता जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल. हि धुरळणी कांदा साठवणुकीच्या आधीच करणे गरजेचे आहे जेणेकरून रासायनिक घटक कांद्यावर पडणार नाहीत.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.