AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा सड (मर रोग) नियंत्रण!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा सड (मर रोग) नियंत्रण!
लक्षणे - जमिनीतील फ्युजॅरियम ऑक्झिस्पोरम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कांदा सड (मर) रोग येतो. काही वेळेस रोपवाटिकेत लागण झाल्यास तसाच पुढे त्याचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगाच्या प्रादुर्भावाने सुरवातीला पाने पिवळसर होऊन वाढ खुंटते. यानंतर पाने शेंड्याकडून करपत येतात. मुळे गुलाबी होऊन सडतात, तसेच मुळालगतचा भाग सडतो. असे कांदे सहज उपटता येतात. उपाययोजना - 1) मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जमिनीत कांदा पीक घेऊ नये, पिकाची फेरपालट करावी. 2) जमिनीची योग्य निवड, लागवडीच्या वेळेस ट्रायकोडर्माचा वापर करावा. १० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात द्रावण तयार करून या द्रावणात रोपे बुडवून लावावेत. 3) रोगाचे लक्षणे दिसताच शिफारशीनुसार बुरशीनाशकांचा वापर करावा. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
49
22
इतर लेख