AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा, लसूण पिकामध्ये एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा, लसूण पिकामध्ये एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
कांदा व लसूण पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी पिकातील रोग आणि किडींचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्टीकोनातून काही मुख्य हानिकारक कीड आणि रोग आहेत, ज्यामुळे पिकाचे अधिक नुकसान होते. ज्यांना नियंत्रित करणे आवश्यक आहे. चला तर मग, या लेखात आपण कांदा व लसूण पिकांमधील रोग आणि किडींच्या व्यवस्थापनाबद्दल जाणून घेऊया._x000D_ _x000D_ प्रमुख किडी:-_x000D_ _x000D_ फुलकिडे (थ्रिप्स):- कांद्यामध्ये फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ कीटक पाने खरडून पानातील रस शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वळतात._x000D_ _x000D_ व्यवस्थापन: या किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ५% एससी @४०० मिली प्रति एकर २०० पाण्यामध्ये मिळसून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी._x000D_ _x000D_ हुमणी कीड:- _x000D_ व्यवस्थापन:- _x000D_ • शेतीमध्ये कच्चे शेणखत वापरू नये._x000D_ • हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी पिकांमधील प्रादुर्भावित रोपांच्या बुंध्याजवळ औषध ३-४ इंचापर्यंत खाली पोहोचेल, अशा पद्धतीने क्लोरोपायरायफॉस २०% ईसी @५००मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी._x000D_ • कार्बोफ्युरॉन ३% सीजी १३ किलो प्रति एकर धुरळणी करावी._x000D_ _x000D_ प्रमुख रोग:-_x000D_ _x000D_ जांभळा करपा (Purple blotch): पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्टयाचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो._x000D_ _x000D_ नियंत्रण:- मेटालॅक्झिल ४% + मॅन्कोझेब ६४% @४०० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी._x000D_ _x000D_ करपा रोग:- या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, पानांच्या वरच्या भागावर हलके नारंगी रंगाचे डाग पडतात._x000D_ _x000D_ नियंत्रण:- _x000D_ मॅन्कोझेब ७५% डब्ल्यूपी @५०० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
637
0
इतर लेख