AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा ,लसुन काढणी साठवणीचे योग्य नियोजन हवे
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा ,लसुन काढणी साठवणीचे योग्य नियोजन हवे
रब्बी कांद्याची काढणी व साठवण • कांदा काढणीच्या १० ते १५ दिवस आधी पाणी देणे बंद करावे • पिकांची काढणी ५० टक्के माना पडल्यावर करावी • पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा कांदा काढल्यावर तो शेतामध्ये पातीसह सुकवून द्यावा प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा कि दुसरी ओळ पहिल्या ओळीचा कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. • तीन दिवसानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सेंमी लांब नाळ ठेवून कापावी त्यामुळे रोग जंतूचा कांद्यात सहजाहजी प्रवेश होत नाही. • तळाशी व बाजूना हवा खेळती राहील अशा प्रकारच्या साठवण गृहामध्ये कांदे साठवावे . कांदा बिजोत्पादनाची काढणी व साठवणूक • बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्याचा रंग तपकिरी होतो बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते गोंड्यात बी काळपट झाल्यावर गोंडे काढावीत. • सर्व गोंडे एकदम तयार होत नाहीत ते जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत साधारणपणे गोंड्याची काढणी ३ ते ४ वेळा करावी. • गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीत पसरून ५ ते ६ दिवस चांगल्या उन्हात सुकवून घ्यावीत.सुकलेल्या गोंड्याना काठीने हळूहळू कुठून वेगळे करावे त्यानंतर उफननी करून बी स्वच्छ करावे.उत्तम प्रतीचे बी एकत्र करून उन्हात सुकवून द्यावे साठवणीसाठी ६ टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता नसावी.
लसून पिकाची काढणी व साठवण • जवळजवळ ५० टक्के पाने सुकल्यावर लसणाची काढणी करावी. • लसणाची काढणी गड्ड्यासहित करायला हवी • लसून गाद्द्यासह २ ते ३ दिवस शेतातच सुकवून द्यावा.त्यामुळे साठवण क्षमता वाढते • लसून लहान कुदळीने किंवा खुरप्याने काढावा व त्याची प्रतवारी करावी • काढलेल्या लसणाची पाने ओलि असताना २० ते २५ सारख्या आकाराची गड्ड्याची जुडी बांधून घ्यावी त्यानंतर अशा जुड्या झाडाखाली १५ दिवस सुकवाव्यात त्यानंतर त्या साठवणगृहात ठेवाव्यात. डॉ शैलेंद्र गाडगे (कांदा व लसून संशोधन संचानालय राजगुरूनगर जि. पुणे) अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस ५ डिसे १७
35
2
इतर लेख