गुरु ज्ञानAgrostar India
कांदा रोपांमधील पिवळेपणावर उपाय!
🧅जमिनीत जास्त ओलाव्यामुळे कांदा पिकाच्या रोपांवर ताण आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिवळेपणा दिसून येतो. कालांतराने रोपांचे शेंडे करपले जातात व मूळकूज सारखी समस्या येते. यावर उपाययोजना म्ह्णून जमिनीत वापसा येण्यासाठी आणि रोपांच्या वाढीसाठी अमोनियम सल्फेट या खतासोबत बुरशीचा प्रादुर्भाव
टाळण्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक मिसळून जमिनीतून द्यावे. तसेच समुद्री शेवाळी घटक असलेले प्युअर केल्प @3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
🧅संदर्भ:Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा