AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा रोपवाटीकेत गादीवाफ्याचे नियोजन !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा रोपवाटीकेत गादीवाफ्याचे नियोजन !
🧅सपाट वाफ्यात पाणी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे वाहत जाते. यात बियाणे वाहून जाण्याची शक्यता असते. तसेच पावसाळ्यामध्ये सपाट वाफ्यांमध्ये पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास तसेच पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य मानमोडी रोग, रोपांच्या मुळांची सड आणि रोपे पिवळे पडणे अशी समस्या येतात. आपण 🧅कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी एक एकर कांदा लागवडीसाठी ३-४ गुंठे क्षेत्रासाठी २ ते ३ किलो बियाणे वापरावे. ➡️ रोपवाटिका साठी निवडलेली जमीनीची मशागत करून भुसभुशीत करून घेणे आणि मोठे दगड किंवा बारीक ढेकळे तसेच गवताचे धसकटे वेचून घ्यावीत. ➡️ त्यानंतर गादी वाफे बनवताना प्रति वाफ्यात ७-८ किलो चांगले कुजलेले शेणखत, १५०-२०० ग्रॅम १९:१९:१९ आणि ५० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक ५० ग्रॅम ह्यूमिक ऍसिड मातीत एकसमान मिसळून द्यावे. ➡️गादी वाफे एक मीटर रुंद व तीन मीटर लांब आणि वाफ्याची उंची 15 सें मी ठेवावी. ➡️पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कार्बेन्डाझिम २ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पॅकेटबंद बियाणांवर उपचार केलेले असतात त्यावर पुन्हा उपचार करण्याची आवश्यकता नसते. ➡️🧅बियाणे ओळींमध्ये १ ते १.५ सें.मी. खोलीवर टाकावे. ओळींमध्ये साधारण ५ सें.मी. अंतर ठेवावे.बी पातळ पेरून मातीने झाकून टाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे. ➡️रोपवाटिका लहान असल्यास बियाणाची उगवण होईपर्यंत झारीने पाणी द्यावे. रोपवाटिकेच्या विस्तार मोठा असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाची सोय करावी. ➡️साधारण ६-८ दिवसांनी बियाणांचा उगवण झाल्यानंतर वाफ्यावर आलेले हलके गवत काढावे. गवत वाढल्यास किडींचा पादुर्भाव तसेच रोपे पिवळसर होऊ शकतात. ➡️कांदा🧅 बियाणे उगवुन आल्यावर २० ते २५ दिवसांनी रोपांची वाढ जोमदार होणेसाठी १९:१९:१९ हे विद्राव्य खत २ ग्रॅम प्रती लिटर फवाराणी करावी. ➡️🧅रोपे साधारण ४५ ते ५० दिवसांची झाल्यानंतर पुनर्लागवडीसाठी वापरावी. 🧅संदर्भ: अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
6
इतर लेख