AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा रोपवाटिकेतील तण नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
कांदा रोपवाटिकेतील तण नियंत्रण!
🌱खरिफ हंगामातील कांदा पिकाच्या रोपवाटिकेमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तण नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. वेळेत तण नियंत्रण न झाल्यास त्याचा रोपांच्या वाढीवरती परिणाम होतो. यासाठी गोल पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी ऑक्सिफ्लोरफेन 23.5% घटक असलेले ऑक्सिवीया तणनाशक 10 मिली आणि त्यासोबत लांब पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल 5% घटक असलेले क्विझ मास्टर तणनाशक 20 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करावी. तणांच्या चांगल्या नियंत्रणासाठी तण 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असताना फवारणी करावी तसेच फवारणी करताना जमिनीमध्ये ओल असावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख