AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
गुरु ज्ञानAgrostar
कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
🌱खरीफ कांदा लागवडीचे नियोजन करत असाल. तर रोपवाटिकेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे कारण खरीप कांद्याच्या रोपवाटिकेत बियांची उगवण न होणे, रोपाच्या पाथीला पीळ पडणे, मुळांची सड आणि रोपे पिवळे पडणे अशा अनेक समस्या बघायला भेटतात. 🌱रोपवाटिकेसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. सपाट वाफा न बनवता गादीवाफे तयार करावे कारण सपाट वाफ्यात पाणी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे वाहत जाते. यात बियाणे वाहून जाण्याची शक्यता असते. 0.5 फूट उंच, 1 मीटर रुंद आणि 3 ते 4 मीटर लांबीचे गादीवाफे बनवावे. 🌱बियांची चांगली उगवण होऊन दर्जेदार रोपे मिळण्यासाठी प्रत्येक वाफ्यामध्ये 3 किलो SSP, 10 ग्रॅम धानुस्टीन, 50 ग्रॅम फ्युरॅडोन मिसळावे. वाफ्यावरती 1 ते 1.5 सेमी खोल रेषा पाडून ओळींमध्ये हाताने बी टाकून मातीआड करावे आणि प्रत्येक लाईन मध्ये 5 सेमी अंतर असणे आवश्यक आहे. त्यानंतर पाण्याचे योग्य नियोजन करावे. 🌱रोपे विविध बुरशीजन्य रोगांना बळी पडू नये यासाठी अवस्थेनुसार योग्य बुरशीनाशकांचा आळवणी अथवा फवारणीच्या माध्यमातून वापर करावा. रोपे 40 ते 50 दिवसांची झाल्यानंतर पुनर्लागवड करावी. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
1
इतर लेख