कृषी वार्ताप्रभात
कांदा, बटाटे व खादयतेलांच्या किंमतीत वाढ
नवी दिल्ली – केंद्र शासनाने कांदयाचे दर कमी पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच दिल्ली व लगतच्या क्षेत्रात बटाटे, खादयतेल व इतर भाज्यापाल्यांच्या किंमतीत वाढ होत आहे. भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या आठवडयात पाऊस झाल्यामुळे हा परिणाम झाला असल्याचे आझादपूर या घाऊक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सांगितले.
मागील आठवडयात झालेल्या पावसामुळे टोमॅटो, बटाटे व इतर भाजीपाल्याचे दरही वाढले आहे. कोबी, गवार, गाजर इ. दर वाढले असल्याचे ही व्यापाऱ्यांनी सांगितले. पावसामुळे शेतकऱ्यांना पाणी साठलेल्या शेतीतील भाजीचे पीक काढून बाजारपेठेत पाठविणे अववघड झालेले आहे. त्यामुळे दिल्ली व लगतच्या भागातील नागरिकांना भाजीपाला नियमित दरापेक्षा जवळजवळ दुप्पट दराने विकत घ्यावा लागत आहे. आणखी पाऊस नाही झाला तर परिस्थिती सुधारण्यास दोन आठवडयाचा कालावधी लागू शकतो. संदर्भ – प्रभात, १८ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
110
0
इतर लेख