कृषी वार्ताकृषी जागरण
कांदा, बटाटयाच्या दरात १५% ची घसरण होण्याची शक्यता
नवी दिल्ली - नवीन शेतमालाची आवक वाढल्याने महिन्याभरात कांदा, टमाटे आणि बटाट्यांचा दर १० ते १५ टक्क्यांनी कमी होणार आहेत. लासलगावात ठोक कांद्याची किंमत १ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल आहे. एप्रिल महिन्यात दराची घसरण ९०० ते १ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. यामुळे किरकोळ किंमतींमध्येही घसरण होईल, असा अंदाज अ‍ॅग्री बिजनेस रिसर्च अँड इंफर्मेशन फर्म अ‍ॅग्रीवॉचचे मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर नटराजन यांनी व्यक्त केला आहे. _x000D_ मननाडमध्ये कांद्याची आवक ही ५ हजार क्किंटल असून बाजार भाव ५०० ते १७६० रुपये प्रति क्किंटल आहे. तर सर्वसाधरण दर १ हजार ५५० रुपये आहे. दिल्लीच्या आजादपूर बाजारात मागील महिन्यात कांदाची ठोक किंमत १६ टक्क्यांनी खाली आल्या. तर टमाट्यांच्या किंमती दर ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. नवीन शेतमाल बाजारात बाजारात आल्यानंतर चालू दरावरुन बटाट्यांचा दर १५ टक्क्यांनी घसरतील अशी शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या बाजारात नवीन शेतमाल येत आहे. यामुळे कांदा, बटाटा, टमाट्यांचा दर कमी होण्याची शक्यता आहे. _x000D_ संदर्भ – कृषी जागरण, १२ मार्च २०२०_x000D_ ही महत्वूपूर्ण माहिती लाइक करा अन् शेअर करा. _x000D_
49
0
इतर लेख