AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकात फुलकिडे प्रादुर्भाव लक्षणे आणि उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
कांदा पिकात फुलकिडे प्रादुर्भाव लक्षणे आणि उपाय!
🌱कांदा पिकात सर्वाधिक नुकसान करणाऱ्या आणि सर्व अवस्थेत आढळणाऱ्या ह्या किडी म्हणजे फुलकिडे हे फुलकिडे पिवळसर तपकिरी असून, शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. पिले व प्रौढ पाने खरवडून त्यातील रस शोषतात. त्यामुळे पानांवर भुरकट चंदेरी ठिपके पडतात. परिणामी पानाचे शेंडे वाकडे होऊन पात करपली जाते. फुलकिड्यांनी केलेल्या जखमांतून करपा रोगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. रोपावस्थेतील प्रादुर्भावामुळे पाने वाळून कांदे पोसत नाहीत. यावर उपाय म्हणून लॅम्बडा सायहॅलोथ्रीन + थायमिथोक्साम घटक असणारे किल एक्स कीटकनाशक @ 80 मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणीसाठी वापरावे. किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फवारणी करताना चांगल्या गुणवत्तेच्या स्टिकर चा वापर करावा. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
1
इतर लेख