AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील मुळकुजवरील उपायोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
कांदा पिकातील मुळकुजवरील उपायोजना!
मुळकुज हा कांदा पिकावरील प्रमुख रोग असून ह्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते. १) या रोगामुळे कांद्याची पाने पिवळी पडतात व पिवळेपणा बुडख्याकडे वाढत जातो. नंतर पाने सुकून कुजतात. २) लागण झालेल्या झाडाची मुळे कुजतात व रोगाटलेले झाड सहज उपटून येते. ३) मुळे काळसर तपकिरी रंगाची होतात व झडून बारीक होतात. ४)रोगाची लागण झालेले कांदे साठवणीत बुडख्याकडून सडतात. उपाय -१)बियाणे पेरणीपूर्वी ३ x १ मी. आकाराच्या गादी वाफ्यावर काॅपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम प्रति वाफा या प्रमाणात मिसळावे. तसेच पेरणीनंतर १५ दिवसांनी पुन्हा ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दोन्ही ओळीच्या मधोमध ड्रेंचिग करावे. त्यानंतर वाफ्याला त्वरीत पोहोच पाणी द्यावे. २)रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी. ३) लागवडीकरिता जमीन उत्तम निचरा होणारी व मध्यम प्रतीची असावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
12
इतर लेख